Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umendra Bisen

Children Stories Comedy Children

4.1  

Umendra Bisen

Children Stories Comedy Children

माझी शाळेतील सहल

माझी शाळेतील सहल

2 mins
167


आपण उद्या सहलीला जाणार हा शब्द पहिल्यांदा कानी पडला, तो माझ्या प्राथमिक शाळा रामाटोला येथिल शिक्षक मेश्राम सर यांच्या मुखातून आणि आम्ही सर्व विद्यार्थी आनंदी झालो. नोव्हेंबर १९९४ ची ही सहल खरंच आम्हा दहा वर्ग मित्रांना सदैव स्मरणात राहील अशी झाली होती.

  आम्ही चौथ्या वर्गात फक्त पाच मुलं आणि पाच मुली असे एकूण दहा विद्यार्थी होतो. सरांनी विषय काढला की आपण उद्या सहलीला जाऊया पण जायचं कुठं? हा सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला. शाळेच्या जेवण तयार करणाऱ्या जनाबाईंनी आपल्या आमगाव तालुक्यातील पुजारीटोला धरण हे नाव सुचवताच आमचे आनंद द्विगुणित झाले. धरण हा शब्द कानी पडताच खूप आनंद झाला. सगळ्यांनी सकाळी ८ वाजता पायी निघायचे ठरले. शाळेपासून अंतर जेमतेम ७ कीलो मीटर पण आनंद त्या वयात खूप लांब जाण्यसारखा होता. सगळ्यांनी जेवणाचे डबे,फराळ, चिवडा खायच्या वस्तू पिशवीत घेतल्या आणि निघालो. चालतांना रामपूर हे गाव लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला धानाचे पिक छान दिसत होते. येणारे जाणारे लहान मोठी वाहने आमचं लक्ष वेधून घेत होते. थोड्या अंतरावर साखरीटोला हे गाव लागले पण गावापेक्षा थोडं मोठं आणि सर्व सुख सोयी उपलब्ध होतील असे गाव म्हणता येईल. सर्वांनी आपल्या सोबत घेतलेल्या पैशाने खाऊ घेतलं,चालत चालत खाऊ खात दोन तिन गाव ओलांडले, लगेच पुजारी टोला हे गाव लागले.सगळ्यांना खूप आनंद झाला. थकवा पण जाणवत होता पण धरण बघण्याची उत्सुकता थकवा जाणवू देत नव्हती.

   एका मोठ्या झाडाच्या सावलीत सगळे बसलोय. आमचे शिक्षक मेश्राम सर यांनी सगळ्यांना सुचना केली, धरण बघताना,कुणीही कडेला जाऊ नका. एका रांगेत सर्वांनी धरण बघा. सगळ्यांनी धरणं बघीतले सर्व जाम खूश झाले. परत येऊन एका लहानशा फुलांच्या बागेत झाडाखाली बसून जेवणाचे डबे उघडले, आणि एकमेकांना आणलेली भाजी, पुऱ्या, पोळ्या फराळ देत जेवण केले. थोड्या वेळाने मनोरंजन म्हणून गाणी, कविता, गावाची नावे भेंड्या खेळलो. सरांनी त्या धर्मा विषयी बरीच माहिती आम्हाला दिली. हे धरण वाघ नदीवर बनलेले आहे.मातीचा भराव व दगडांनी बांधलेला आहे.धरणाला तेरा दार आहेत शेती पिण्याच्या पाण्याची सोय हा धरण करतो. अशी भरपूर माहिती सरांनी दिली,नंतर बागेत फीरून एका आईच्या कुशीत बाळाला घेतलेला पुतळा आकर्षणाचा भाग बनला.

   आता परत घरी यायला निघालो. आपल्या पिशव्या घेऊन घराची वाट धरली. एक अतुलनीय सहल आम्हाला आमच्या मेश्राम सरांनी करून दिली. सदैव स्मरणात राहील लहानपणी एखादी गोष्ट बघायची इच्छा पूर्ण झाली की,जो आनंद होतो खरंच खूप अतूलनीय असते, हे या सहलीतून कळले.



Rate this content
Log in