STORYMIRROR

Umendra Bisen

Fantasy Children

3  

Umendra Bisen

Fantasy Children

शाळेतला बाक

शाळेतला बाक

1 min
186

माझा शाळेतला बाक

देतो आठवणी आज

होते त्या बाकावरचे

मित्र ते जिगरबाज.


असो विषय कोणता

जागा होती ती निश्चित

बाक आपला पहिला

कुणा नव्हतेच भीत.


जर का कुणी बसला

माझ्या जागी बाकावर

त्याला भांडल तरच

मिळे ताबा जागेवर.


तंटे व्हायचे लहान

पण मजा होती मस्त

होते दिवस मजेचे

तरी अंगी होती शिस्त.


आता झाला शाळेतही

खुप काही बदलाव

शाळा आता डिजिटल

पण जुना नाही ठाव.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy