STORYMIRROR

Umendra Bisen

Inspirational Others

3  

Umendra Bisen

Inspirational Others

माय मराठीचे गुणगान

माय मराठीचे गुणगान

1 min
211

माय मराठी अमुची 

पडो न विसर तुझा

दिले कोहिनूर आम्हा

ज्यांचा जगी गाजावाजा.


आहे संस्कृत उगम

पूर्वजांची आहे देण

जपू तिला सांभाळून

आहे आम्हावरी ऋण.


करू भाषेचा जागर

संवर्धन हे निर्धार

तरूणांनी येऊ पुढे

करू भाषा दर्जेदार.


ध्यास असावा अपुला 

नाव व्हावे मराठीचे

अभिजात दर्जा मिळो

हेच संकल्प मनाचे.


जपू नैतिक कर्तव्य

मिळविण्या भव्य स्थान

करू गुणगान तिचे

वाढवू या जगी मान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational