आठवते तुझी माया
आठवते तुझी माया
तुझ्या सावलीत रहावे
इच्छा अपूर्णच राहिली
का ग एवढ्या लवकर
तू पोरका करून गेली.
तुझ्या पदराचा तो स्पर्श
अजुनही मी जाणवतो
नाही तू सोबतीला आई
तुझी साथ अनुभवतो.
मायेचा पदर सुटला
जरी माझ्या डोक्यावरून
जगलो आई तुझ्या जुन्या
आठवणी गोळा करून.
तुझी कमी पुर्ण कराया
मदतीला आई तुझीच
दिला एवढा प्रेम मला
की जाणवली ना कमीच.
आई नसेल त्याला खरी
लाभो अशी एक माऊली
वाटेल पावलोपावली
आईचीच जणू सावली.
