STORYMIRROR

Umendra Bisen

Classics

4  

Umendra Bisen

Classics

एक धागा रक्षणार्थ

एक धागा रक्षणार्थ

1 min
245

बहिण भावाच्या प्रेमाचा

आहे हा अतुट बंधन

हिंदू संस्कृतीत पवित्र

सण आहे हे रक्षाबंधन.


भावाचा उत्कर्ष तो व्हावा

अशी या सणाची महती

बहिणीची रक्षा करावी 

हीच भावाची असे नीती.


राखी बांधून हातावर

मिळे रक्षणाचे वचन

लाभो दिर्घायुष्य भावास

बहिणीचे असते मन.


धागा नाजूक हा राखीचा 

घट्ट प्रेम तो दर्शवतो 

निस्वार्थ प्रेमाचे दर्शन 

बहिण भावात दिसतो .


एक धागा रक्षणार्थ हा

बांधू बहिणीच्या हातून

देऊ वचन बहिणीला

येऊ हाकेवर धावून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics