STORYMIRROR

Umendra Bisen

Inspirational Others

3  

Umendra Bisen

Inspirational Others

महाराष्ट्राची गौरव गाथा

महाराष्ट्राची गौरव गाथा

1 min
184

प्रथम करू वंदन हुतात्म्यांना

दिले महाराष्ट्रासाठी बलीदान.

संयुक्त महाराष्ट्रा करीता ज्यांचे 

लाख मोलाचे आहेत योगदान.


जय जय गर्जा महाराष्ट्र माझा 

महाराष्ट्राचा जगात गाजावाजा.

ज्यांचा आदर्श घेते सगळी प्रजा

इथे जन्मलेत छत्रपती राजा.


माझ्या महाराष्ट्राच्या पवित्र स्थळी 

इथे जन्मले थोर महात्मे ज्ञानी.

धन्य झाली भारतातील जनता

शाहू,फुले,आंबेडकरी मार्गानी.


धन्य-धन्य महाराष्ट्र संत भूमी

पावन झाली ही थोर विभूतींनी.

केलाय अजरामर इतिहास

जगी थोर त्या महारथींनी.


महाराष्ट्राला भौगोलिकदृष्ट्या 

मिळालाय असा भव्य दिव्य स्थान 

भिमा,कृष्णा,गोदावरी वाहतात 

वाढवितात देशात बहुमान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational