STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Inspirational

3  

Sanjay Dhangawhal

Inspirational

आरसा

आरसा

1 min
227

चेहरा कितीही सुंदर असला

तरी आरसा खोट बोलत नाही


तुम्ही आपल्याशी आणि आपल्यांशी

किती प्रामाणिक आहात

याचे एकदा आत्मपरीक्षण झाले पाहीजे


किणीही लपवले तरी सत्याच्याआड खोटं

जास्त दिवस लपून राहत नाही

एकदिवस ते उजेडात येतेच

 

खोटी सहानुभूती आणि खोटं प्रेम

करणारी व्यक्ती विश्वासू कधीच नसते 

 

जेव्हा,मतलब,स्वार्था,हेतू साध्या झल्याच कळते

तेव्हा पश्चात्तापशिवय काहीच नसते.


क्षणभंगुर सुखासाठी

वाट चुकली की प्रायश्चित्तही करता येत नाही 

तेव्हा पावले जपुन टाकावीत


तुमच्या सोबतचा माणुस किंबहुना चालता बोलता भेटणारी माणसं

किती चांगली?

हे ओळखता आले म्हणजे मनस्ताप होत नाही


ओळख खुप लोकांशी असते

पण मन मोकळे आपल्याच हक्काच्या माणसाजवळ करता येते 


तुम्ही जास्त काळ

दुसऱ्याला रडवू अथवा दुःख देवू शकत नाही.


 जिंकण्याची संधी प्रत्येकाला मिळते

नेहमी जिंकणाऱ्यचा एकदिवस पराभव निश्चीत असतो.


एखाद्याशी खोट बोलून फसवणूक करणे

म्हणजे स्वताला उध्वस्त करून घेणे.


दुःखात,संकटात आजारपणात,

फक्त आपलीच माणस जवळ असतात

तेव्हा भूरळ घालणारी नातेसबंधी पारखून घेतली पाहीजे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational