फुलपाखरू
फुलपाखरू
आज मी पाहिले
चित्रातील फुलपाखरू...
लिहिण्याचा मोह माझा
कसा बरे आवरू?
मोहक फुलपाखरू
रंग गुलाबी छान...
फुलातील गंध घेता
हरवी देहभान ।।
कधी इथे कधी तिथे
चंचल भासे फार....
अल्पायुषी परी ते
कधी न माने हार।।
उत्साहाने भरलेला
त्याचा हर एक क्षण...
पाहून त्याची सुंदरता
मन होई प्रसन्न ।।
निसर्गाची किमया ही
फुलपाखरू फिरते....
विहार करता अचानक
भूमीवर ते पडते ।।
क्षणभंगुर आयुष्य हे
स्वच्छंदी जगावे....
फुलपाखरासारखे
जीवन रंगीबेरंगी असावे।।