STORYMIRROR

Rama Khatavkar

Inspirational Others

3  

Rama Khatavkar

Inspirational Others

नवे वर्ष -

नवे वर्ष -

1 min
199

सूर्य उगवतो हलके हलके

पुसत कालची रात्र

नव्या प्रकाशा सोबत आशा

इथे, तिथे सर्वत्र.


उलटुनी एका जुन्या दिनांका,

अंक नव्या दिवसाला,

आपण देतो, सोयीसाठी,

अर्थ फार ना त्याला.


दिवस जोडुनी दिवसाला, ते 

महिने महिने जाती,

बघता बघता आपण म्हणतो 

वर्षे येती जाती...


निसर्ग थोडा असे वेगळा

ऋतूंप्रमाणे फिरतो,

वर्षा, शरद नि हेमंताच्या 

हाती हातच देतो.


नंतर येतो शिशिरासंगे 

वसंत हा वेगळा,

नवा साज सृष्टीस देऊनी

करी नवा सोहळा.


तिथून होते सुरू चक्र हे,

चैत्रपालवीसवे,

आविष्कार असे सृजनाचा 

गीत गुंजते नवे.


पिढीजात आपल्या ज्ञानाची

हवी धराया कास,

आताच नुकते सांगुन गेले

वर्ष वीसशे वीस


'नवे' वर्ष हे या अर्थाने

आपण घेऊ या,

चैत्रपाडव्याला हर्षाची 

गुढी उभारू या.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational