STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational Others

3  

Sanjana Kamat

Inspirational Others

नववर्ष

नववर्ष

1 min
220

निरोप स्मृती सरलेल्या क्षणांची,

अनुभव,स्नेह जीवन निर्झर प्रवास.

सुख दुःखाचा हिंदोळ्यावर झुलत,

नवचैतन्याची गरुडझेप अट्टाहास.


स्वागता नववर्षाच्या गुलाल उधळत,

सदा परिवर्तन क्रांती दरवळे मृदगंध.

सद्विचार,आदर्श घडवी सोनेरी दिवस,

नसानसात धूर देशभक्तीचा सुगंध.


पाहे संकल्प नववर्षाचे समृध्द पहाट,

पेरत शांत मृदगंध, सृजानाचे बीज.

उच्चीतधैर्य प्राप्ती उंच चढे शिखर,

सुखसमृध्दीचे लाभे निर्मळ क्षितिज.


अंंतरी नक्षत्र चांदणे अमृतकण वेचत,

धरे कर्तव्याची कास पूण्य यज्ञकर्म.

सुसंकल्प, निश्चयाची कर्तृत्व जाण,

चढे जीवन सार्थकी दातृत्वाचे मर्म.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational