STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational Others

कोरोना

कोरोना

1 min
166

लई झाले थैमान कोरोनाचे,

लई अती झाले या विषाणूचे 

आता या कोरोनाच्या आजाराला 

सर्व मिळून गाडायचे 

लढा आपण सारे देऊ 

कोरोनाग्रस्तांना जीवदान देऊ


केला विनाश मानवाचा,

व्हायरस पसरला जगभर त्रासाचा 

सापडले सारे जग मरणाच्या खाईत

अती भयंकर महामारीच्या चक्रव्युहात 

या कोरोनाच्या भयंकर विळख्यात


धडाधड मृत्यूचे तांडव,

सडे पडले धरतीवर 

साऱ्या जगाला सतावले 

साऱ्या मानवाला रडवले 

आता नाही याला रे सोडायचे 

कायमचे पळवून लावायचे


लावा शिस्त स्वत:ची स्वत:ला 

अनमोल जीव वाचविण्याला 

सुख, शांतीने जगायचे,

सारे मतभेद विसरायचे 

मदत करा सारे जण

होवू द्या सर्वांची एकत्र मन


आधार द्या रे गरीबांना 

आधार द्या रे कोरोनाग्रस्तांना 

कोरोनाची दहशत संपवू 

पुन्हा विजयी होवू  

पूर्वीसारखे चैतन्य आणू


कोरोनाला आपण हरवू 

अंत कोरोनाचा करू

साऱ्या जगाला वाचवू 

साऱ्या मानवाला जगवू 

आपणच सर्व जिंकू


निघू नका घराच्या बाहेर 

वेळ सांगून नाही येणार 

जीव अनमोल आहे खरं 

आयुष्य होईल क्षणभंगूर 

रक्षण करा खरोखर


कायदा सरकारचा पाळा 

शिस्त स्वत:ची स्वत:ला लावा 

आता सर्वांनी देशाला वाचवा

कोरोनाला सर्व मिळून हरवा 

जीव स्वत:चा स्वत: वाचवा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational