STORYMIRROR

Umendra Bisen

Inspirational Children

3  

Umendra Bisen

Inspirational Children

आला श्रावण मास

आला श्रावण मास

1 min
159

मास हा चैतन्याचा 

एक उत्साह मनात

उत्सवांची रेलचेल 

व्रत पूजा श्रावणात.


निसर्गाची हिरवळ

दृश्य दिसे मनोहर

वसुंधरा पांघरते

शालू हिरवी सुंदर.


मास ऊन पावसाचा

लपंडाव चाले छान

वृक्ष वेलीचे श्रृंगार

आकर्षित करी ध्यान.


दर-दिवशी महत्व

असे श्रावण मासात

व्रत पूजा उपवास

भक्ती भाव उत्साहात.


उत्सवाचा राजा आहे

ऋतु हा श्रावणमास

म्हणूनच श्रावणाला

ऋतूमध्ये मान खास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational