Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umendra Bisen

Tragedy Inspirational

4.0  

Umendra Bisen

Tragedy Inspirational

स्वातंत्र्याची पहाट..

स्वातंत्र्याची पहाट..

1 min
116


*उजाडला दिवस असा सोनेरी*

*१५ ऑगस्ट प्रजासत्ताकदिनी* 

*उपकार सूरवीरांचे झालेत*

*नतमस्तक होऊ त्यांच्या चरणी.*

     स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आली. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज आपण ज्या सन्मानाने जीवन जगत आहोत याचा खरा श्रेय स्वातंत्र्य संग्रामात सहभागी सर्व शूरवीर योद्धांना जातो. स्वातंत्र्याची रम्य पहाट बघण्याचे सौभाग्य त्यांच्या दिलेल्या बलिदानाचे फलित आहे.

  भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही एक ऐतिहासिक घटनांची मालिका होती. या मालिकेचा खरा उद्देश ब्रिटिश राजवटीचा नायनाट करणे हेच म्हटले तरी वावगे ठरणार नाही.१८५७ पासून जी मोहीम हाती घेतली ती मोहीम १९४७ पर्यंत विविध उठावातून दिसून येते. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध,असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन अशा विविध चळवळ उठावातून आपल्या स्वातंत्र्या करीता देशभक्तीची भावना रूझविण्याचा एक चंग बांधला गेला. जनमानसांच्या मनात ह्या उठावांनी जुलमी शासना विरोधात बंड करण्याची उर्मी निर्माण केली. 

   स्वातंत्र्य सेनानी, क्रांतीकारक, आझाद हिंद सेना, यांच्या अथक परिश्रमाने भारताच्या स्वातंत्र्याची बीजे रोवली गेली. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात संपूर्ण भारतातून सहभागी जनसामान्यांच्या मागणी समोर ब्रिटिश राजवटीचा पतन होण्यास प्रारंभ झाला. भारत देशाची सुत्र देशाच्या राज्यकर्ते यांच्या हाती १५ ऑगस्ट १९४७ ला मिळाले आणि भारत स्वतंत्र झाला.

   स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे लोटली. बरेच बदल घडून आले पण बदलली नाही ती स्वातंत्र्याची ध्वजारोहण करण्याची परंपरा आणि ती चिरकाल टिकून राहील व स्वातंत्र्याची पहाट सदैव स्मरणात राहील.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy