स्त्री शक्तीला सलाम
स्त्री शक्तीला सलाम
तिच्या आसवांचा|| बांध तो फुटला||
कंठ जो दाटला|| काळजात||१||
असे जीवनात||दुःखाचा डोंगर||
आसवांची धार||आयुष्यात||२||
संसाराचा बोजा||घेउनच चाले||
नाही कुणा बोले|| नारी जात||३||
आयुष्य हे तिचे|| चुल आणि मुल||
होईल बदल|| आशेवरी||४||
नाही अबला ती||ठेवा ह्याचे भान||
द्यावा तिला मान|| आतातरी||५||
आधुनिक काळ||बदल घडावा||
मोकळीक द्यावा||स्त्रीला जरा||६||
नारी ती असते|| जगत जननी||
ऋण सगळ्यांनी|| फेडावेत||७||
युग एकीसावे|| घेऊ द्या भरारी||
मदत ती सारी|| करा तिला||८||
पंख तिचे आता|| बळकट करा||
हाच मान खरा|| आहे तिचा||९||
उमेंद्रची वाणी|| करे विनवणी||
ह्या महिला दिनी|| सर्वांनाच||१०||