STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

आयुष्य असतं आपलं आपलं

आयुष्य असतं आपलं आपलं

1 min
309

कुठवर करावा विचार जगाचा

विचारांनाही असाव्या मर्यादा,

आयुष्यं असतं आपलं आपलं

मनाशीच मनधरणीचा संघर्ष का करावा


जगरहाटीच्या वाटेवर चालण्याचा

 अट्टाहास कशापायी

समाधानाचं दार बंद करून घुसमटीशी

मैत्री कशापायी


धरला हात मनाचा

ओंजळीत सुखाचा चंद्र हसला

गुंतुनी गुंत्यात मग जगाच्या

गुन्हेगाराचा भाव कशाला


विसावून स्वतःच्या कुशीत

मोकळी करावी वाट स्वप्नांना

ऐकून अंतर्मनाची साद

श्वास मोकळा फुलुनी द्यावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational