STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

3  

Neha Ranalkar(Nawate)

Inspirational

विषय:- महती यशाची

विषय:- महती यशाची

1 min
325

अपयश ही यशाची पहिली 

जरी असते पायरी म्हणती |

काय वर्णावी चढलेली धुंदी

सांगता यशाची ती महती | |१| |


यश विचारा काय असते

नेहमीच येते अपयश ज्याला |

अनेकदा प्रयत्न करुनही ज्या

यश दुरापास्त होते त्याला | |२| |


यशाची माळ पडता गळ्यात

सारी कौतुकाने पाहती त्याला |

अपयश पदरी आले तर कुणी

धीराचेही बोल न दिले ज्याला | |३ | |


अपयश होते दिनवाणे तेव्हा

कौतुकाचे सोहळे यशाचे घडती |

यशाची असते वेगळी मजा खरी

यशोमाळा गळ्यात जेव्हा पडती | |४| |


सगळ्यांना वाटते मनापासून तरी

सदा यशस्वीच सर्वत्र व्हायला |

अपयशाच्या भीतीनेच कित्येकदा

घाबरती स्पर्धेतच भाग घ्यायला | |५ | |


अपयश ही यशाची पहिली पायरी असली तरी यशाची महती नाकारता येत नाही. सततचं अपयश माणसाला निराशेच्या गर्तेत ढकलतं तर प्रयत्नाती मिळालेलं यश त्याला प्रेरणादायी ठरून यशोशिखरावर नेऊन ठेवते. हेच ह्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational