STORYMIRROR

VINAYAK PATIL

Children

3  

VINAYAK PATIL

Children

पाऊस बालकाव्य

पाऊस बालकाव्य

1 min
253

पाऊस आला, पाऊस आला

गल्लीतुनी पूर वाहिला

चला, चला, रे मुलांनो

नाव पाण्यात सोडू चला ||१||


दंगामस्ती करू थोड़ी

पावसाशी गट्टी करू

थेंब झेलु हातावरती

मातीचे धरण करु ||२||


भिजूनी ओलेचिंब

रागावते आई खूप 

थोडेसे नाचून घेऊ

घरात शिरु गुप-चूप ||३|| 


नाचू गाऊ आनंदाने 

घेऊ पावसाची मजा 

भिजुनिया मनसोक्त

मिळेल सर्वांना सजा ||४||


पाठीवरती आई देईल

एक धपाटा ठेवून

थोडेसे रुसु, मग घेऊ

गरम चहा पिऊन ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children