आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
येते नित्य नेमाने दरवर्षी आषाढी एकादशी
भक्तीभावाने वारकरी जल्लोष करती या दिवशी
दरवर्षी नेमाने भक्त वारी करती पायी,पायी
विठोबा रखुमाई आहे खरोखर भक्तांची आई
शुद्ध होते त्यांचे मन, पाप जाते धुऊन
अंत:करण शुद्ध होते हरीपाठाच्या नामस्मरणान
सर्व जाती धर्माच्या अतूट नात्याचे मुक्तांगण
बहुजनांच्या आनदांची इथे होते मुक्त उधळण
सर्व माणसांचे मोठेपण,नाचतात मनभरून
अशी मज्जा येते या दिवशी,नाचतात फेरधरून
गोरगरीब,श्रीमंत भेदभाव नसे पंढरी नगरीत
पंढरपूरच्या पांडूरंगाचे दर्शन मिळते पवित्र स्थानात
पालखी ज्ञानोबा माऊलीची,पालखी सोपान,निवृतीनाथांची
पालखी तुकोबा माऊलीची, पालखी एकनाथ माऊलीची
पालखी नामदेव माऊलीची,पालखी मुक्ताबाई, जनाबाईची
पालखी सर्व संतांची, राखली परंपरा अखंड महाराष्ट्राची
सर्वधर्म समभावाची इथे मिळते अगाध शिकवण
वारकरी संप्रदाय जगात सर्वात मोठे आश्रयस्थान
त्याच्या सत्संगात मनुष्याचे होते कायम निर्मळ मन
मारले जातात दुष्ट विचार मानवतेची करतो पाठराखण
भव्य संप्रदायाची निर्मिती सर्व युगात प्रेरणास्थान
लाभले महाराष्ट्राला हे भाग्य संत संप्रदायाची खाण
संत सेवेत कीर्तनकार, देशाचे महान प्रबोधनकार
हाती धरून वारकरी संप्रदायाची मशाल या भारतभूवर
ज्ञानेश्वरी मानवाचे खरे चिरंतन अमृतरुपी प्राण
तुकारामांची गाथा, संसार युगी मानवाला सत्य शिकवण
