पाऊस (बालगीत)
पाऊस (बालगीत)
सांग ना आई मला पाऊस कसा पडतो?
थेंब थेंब आभाळातून पाणी कसा टाकतो?
मातीमध्ये अत्तर ग कुठून कसे येते?
मातीच्या वासाने खूप छान वाटते
वीज आपल्या आवाजाने कोणाला घाबरवते?
एवढासा उजेड दाखवून कुठे लपून बसते?
सोसाट्याचा वारा म्हणजे नक्की काय होते?
पाने,फुले,झाडांना मग थंडी नाही का वाजते?
पावसामुळे धान्य येते शेतामध्ये कसे?
धान्यापासून जेवण बनते आपल्या घरी कसे?
जंगलातले प्राणी पक्षी राहतात ग कुठे?
यान्चे का आपल्या सारखे घर असते कुठे?
तू म्हणते देव करतो म्हणजे ग काय करतो?
त्याच्याकडे का आपल्या सारखा रिमोट कंट्रोल असतो?
