वारी
वारी
1 min
343
आता तरी देवा एक करशील का
दर्शनाला तुझ्या मला येऊ देशील का
दोन घटका संसार ईसरून तुला आळवत व्हतो
दर्शन तुझं मनात मी सालभर साठवत व्हतो
टाळ न्हाई,लेझीम न्हाई,फुगडी न्हाई,रिंगण न्हाई
देहभान ईसरून तुज्या नावाचा बी गजर न्हाई
उभ्या बाप जल्मात माजी वारी कधी चुकली न्हाई
असं वाटतं माज्या संसारात विठ्ठलच राह्मला न्हाई
दोन साल वारी चुकली जीवा हूरहूर लागत राही
वारी चुकली म्हणून डोळा पाणी वहात राही
तुज्याफुडं कोरोना काय हाय देवा
न्हाई म्हणु नग एक दान देगा देवा
देऊळ बंद आसलं तरी कळसाचं दर्शन घेईन
देवळाच्या पायरीवर माझं शेवटचं प्राण जाईल
