STORYMIRROR

Shraddha Kulkarni

Others

4  

Shraddha Kulkarni

Others

शाळा एक आठवण

शाळा एक आठवण

1 min
382


झाली आज पहाट जाग आली माझ्या डोळा.

स्वप्नी आले काय कोण कसे सांगू माझ्या सया.


दाट धुके पांघरलेले उभा आडवा पाऊस होता.

नाग मोडी ते वळण खडा उभा रस्ता होता.


हिरवीगार झाडे होती,गोठविणारी थंडी होती.

पाऊस चिंब भिजवताना तुम्ही माझ्या सवे होता.

 

छत्री ,दप्तर सांभाळत रस्ता मागे सरत होता.

या सगळ्यामध्ये ही गप्पांना ऊत आला होता.


किती वाजले कोण जाणे चालण्याचा वाढे वेग

कसेतरी पोहचलो समोर उभे मुख्याध्यापक.


धावत पळत कसेतरी आधी वर्ग गाठला होता.

छडीचा तो मार चुके याच्यामध्ये आनंद होता.


एवढ्यात झाली घंटा काही क्षणांचा खेळ होता.

घंटेच्या त्या आवाजाने जाग मला आली आता.


कशी असेल ग शाळा मनी माझ्या प्रश्न पडला.

बालपण आपले सारे भूतकाळ ग आपला.


खेळ,चेष्टा मस्करी ती मारही खाल्ला होता.

कसे असतील ते वर्ग तारा राणीचा ग वाडा.


कसे वर्गमित्र असती कुठे असती सारे.

शाळेचा तो भाग होतो आपण मिळून सारे.


चांगले वाईट क्षण आपण सारे जगलो होतो.

निरागस बालपण आपण सारे वेडे होतो.


पन्हाळाच न्यारा होता निसर्गाचा ठेवा होता.

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन तो गड होता.


अशा निसर्गाच्या कुशीत वसली होती आपली शाळा.

विद्येचे ते मंदिर होते ज्ञानगंगा आपली शाळा.


विद्येच्या या मंदिरात आदरणीय गुरुजन.

आपोआप जुळती हात केले जाते वंदन.


होते आठवण आता रम्य त्या दिवसांची

बालपण पुन्हा लाभो शाळेमध्ये जाण्यासाठी


अशी शाळा लाभे आपण सारे भाग्यवान.

शब्द पडती अपुरे ते किती गाऊ गुणगान


Rate this content
Log in