देवी
देवी
सात वारात शुक्रवार ग |
आज देवीचा पूजेचा मान ग ||
देवी नेसली शालू हिरवागार ग |
त्यावर शोभते बुटय्यांची माळ ग ||
देवी मळवट भरला कपाळी ग ||
त्यावर शोभतो कुंकवाचा टिळा ग ||
नाक देवीचे आहे धारदार ग I
त्यात शोभते मोत्यांची नथ ग ||
गळा शोभती सोन्याचे हार ग I
कानी कुंडल मोत्यांची वेल ग ||
गजरा माळीला अंबाड्यामधे ग I
पाटल्या,बिलवर चुड्यामधे छान ग ||
जोडवी,मासळी पायी घालून ग I
वाजे मंजुळ पैंजण पायी ग ||
असे देवीचे मनोहारी रूप ग I
मन बघून समाधान होई ग ||
सर्व भक्तांना तिचाच ध्यास ग I
भक्तासाठी ती धाऊन येई ग ||
दुष्ट संहारा साठी रूप घेई ग I
भल्या भल्यांना पाजिते नीर ग ||
भेदी नजरेने मारीते तीर ग I
सर्व दुष्टांचा होई संहार ग ||
देवी रौद्र रुपात पाहून ग I
स्त्री शक्तीचा होई सन्मान ग ||
सात वारात शुक्रवार ग |
आज देवीचा पूजेचा मान ग ||
