हिंदोळा
हिंदोळा
1 min
296
हळूहळू झुलवितो हिंदोळा आठवणींचा
क्षणात उलगडत जातो चित्रपट आयुष्याचा.
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन आनंदविभोर होई
आपुलीच ओळख पुन्हा नव्याने होत जाई.
चांगल्या क्षणांबरोबर चुकांचीही जाणीव होते
आपल्याच वागण्याची खंत मनी बोचत राहते.
आठवणींचा हिंदोळा जगण्याचा भाग होतो
कधी आनंदाचा सोहळा कधी कंठ दाटून येतो
