STORYMIRROR

Vinod Nandu Ikhankar (शब्दप्रेम)

Children

3  

Vinod Nandu Ikhankar (शब्दप्रेम)

Children

बालपण

बालपण

1 min
236

पहाटे उठूनी लवकर

आवरायचो भरभर

अंघोळीचं लावूनी अत्तर

डब्बा घेऊनी,पाठीवरती दफ्तर


शाळेत जायचो,डब्बा खायचो

पाढे म्हणायचो शंभर

पळापळीचा खेळ खेळायचो

त्यात आमचा पहिला नंबर


येता जाता खेळ असायचा

उंच माझा झोका असायचा

खिशात आमच्या भरपूर काही

चिंच,बोरं,कैरी असायच्या


खोटे खोटे घर आमुचे

वाळूचे अन दगडाचे

बांधूनी व्हायचे घर पक्के

कारण सारे हात असायचे 


एका एकाला पकडून

रेल्वे चे डब्बे बनायचो

झुक-झुक आगीनगाडी म्हणायचो

मामाच्या गावाला जाईन म्हणायचो


प्रेम असायचे,जिव्हाळा असायचा

खेळण्यात आमचा दंगा असायचा

लागले कुणास तर सारे रडायचे

कारण एकमेकांवर जीव असायचा


सावली असायची,गार हवा असायची

उद्या असायचा,परवा असायचा

वेळेचे भान इतकेच आमचे शहाणपण

मजेत असायचे आमचे "बालपण"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children