STORYMIRROR

Vinod Nandu Ikhankar (शब्दप्रेम)

Others

3  

Vinod Nandu Ikhankar (शब्दप्रेम)

Others

बळीराजा

बळीराजा

1 min
122

कष्ट करीतो उन्हात

काळ्या मातीत राबतो

बळीराजा तू माझा रं

आत्महत्या का करितो


काळ्या मातीत फुटतो

त्याच्या कष्टाचा अंकुर

रान फुलवितो सारं

मनगटी बळावर

तेव्हा तुझ्या चेहऱ्याला 

साज घामाचा चढतो


जरी मातीच्या या भिंती

त्यात मायेची हो ऊब

कष्टकरी बळीराजा

त्याची किमया हो खुब

बीज पेरून आनंदी

जसं सोनं पिकवितो


ओला पडला दुष्काळ

होई पिकांवर हानी

कधी काळी पाहिलेल्या

फिरे स्वप्नांवर पाणी

लेणं कुंकुवाचं माझं

धनी सुखात राहो दे


संकटाला वैतागुन

फास घेई गळ्याशी

पडे उघडा संसार

पोरं लेकरं उपाशी

तुझ्या नंतर जगणं 

आत्मा देहात नसतो


तूच जगाचा पोशिंदा

साऱ्या जगाला पोसतो

बळीराजा तू माझा रं

आत्महत्या का करितो



Rate this content
Log in