बाप
बाप
माय पुसता पुसता
बाप कधी पुसताच आला नाही मले
कष्टाचा गाडा एकट्यानेच ओढला
एक चाक होताच आलं नाही मले
आते बापावर लिहीन म्हणतो
बाप समद्यासनी सांगीन म्हणतो
मह्या नावा संगे त्याचे नावं
त्याच्यास नावाले चकाकी देईन म्हणतो
व्हता अडाणी त्यो
मले लिहिता वाचता केला
रक्ताचे केले पाणी त्यानं
मले स्वतःच्या पायावर उभा केला
घामात सारा भिजून जायचा
उसवलेला सदरा शिवून घाले
कबाड-कष्टाच्या जगात त्याच्या
आम्हावाली जिंदगानी सुखात चाले
काय सांगू तुम्हांसनी
मह्या बाप काय हाये
त्यो म्हणूनसंग म्या हाये
मह्या "बाप" मह्या "देव" हाये
