STORYMIRROR

Eknath Vishwanath Pawar (Nayak)

Children Stories Tragedy Inspirational

3  

Eknath Vishwanath Pawar (Nayak)

Children Stories Tragedy Inspirational

माझी शाळा

माझी शाळा

1 min
272

लाॅकडाऊनमध्ये कुलूपबंद होती शाळा

सारखी सारखी दिसायची

आठवायची शाळा


शाळेत जाताच जमणारा घोळका

गाणी, गप्पागोष्टी, अभिनय, 

अभ्यासात रमून जायचा दिवस. 

सुट्टी होताच चौक पार करेपर्यंत

हातवारे करून मुले द्यायचे निरोप;

मात्र हे सारे चित्र कोरोनाने केले फस्त. 


मग एकच काळजी वाटायची

मुलांच्या आरोग्याची नि शिक्षणाची. 

शाळा आणि मुलांत दुरावा होणार तर नाही ना? 

शिक्षणाची बाराखडी विसरणार तर नाही ना? 


बिचारी शाळा देखील

 वाट पाहू पाहू दमून गेली असावी

मनातल्या मनात ती सुद्धा

 पार निराश झाली असावी. 


आता उघडावे शाळेचे कुलूप

आणि लेकराच्या मायेने कवटाळावे हृदयाशी 

जीवनदायी शाळेला;

कारण जीवनाची ऊर्जा फक्त शाळेतूनच लाभते. 


Rate this content
Log in

More marathi poem from Eknath Vishwanath Pawar (Nayak)