STORYMIRROR

Eknath Vishwanath Pawar (Nayak)

Inspirational

3  

Eknath Vishwanath Pawar (Nayak)

Inspirational

माणूस मी

माणूस मी

1 min
320

माणूस मी! माणसाचे गीत नवे गाईन मी

मानवतेसाठी जीवन सारे वाहिन मी||धृ.||


एक चंद्र एक सूर्य आभाळ एकच धरती

रंगही रक्ताचा, सर्वांचा एकच असती

माणसाला 'माणूस' म्हणून पाहीन मी||१|| माणूस मी..


लेकरे निसर्गाची ही एकच भाईभाई

मग असोत कोणी, हिंदू मुस्लीम ईसाई

माणसाशी 'माणूस' म्हणून वागीन मी||२|| माणूस मी..


मिटवू दरी, जुळवू नव्याने एक नाती

तू हवा रे! सोबतीला नव्याने एक साठी

संकल्प माणसाला 'माणूस' जोडीनं मी||३|| माणूस मी..


सज्ज मशागतीला नव नांगरणीचा फाळ

भोगती जन हे! सालोसाल मूल्यांचा दुष्काळ

या भुईवरी 'माणूस' नव्याने पेरीन मी||४|| माणूस मी.. 

  - एकनाथ विश्वनाथ नायक


Rate this content
Log in

More marathi poem from Eknath Vishwanath Pawar (Nayak)

Similar marathi poem from Inspirational