STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

परतीचा पाऊस...!

परतीचा पाऊस...!

1 min
27.2K


परतीचा पाऊस...!!


काय रे बाबा

तुझं किती

कौतुक करायचं


खुळ्या सारख

पांगला पांगला

म्हणतात परत यायचं


चार महिन्यांच

पाहुणा तू थोडी

उसंत घेऊन तरी यायचं


गणपती आले

छान बसले जायच्या वेळीं

हे तुझे नाटक कसले...?


डॉल्बी बंदीने

इथे आम्ही

झालोय ना हैराण


निदान

ढोल तरी

जोमाने बडवू दे


शुक्र शुकाट

झालाय साऱ्या

उत्साहाच्या सणाचा


वाटत कोणीतरी

हळूच विचारतय

तुझा घर शेणाच की मेणाचं


इथे कुठे

काय जातंय

खुर्चीत बसून कोणाच


रिकामी तेकडे

आम्ही फिरतोय

हातात नवं नवे झेंडे घेऊन


तू मात्र

येतोस अचानक

रोज नवा फतवा घेऊन


परतीचा म्हणून

कौतुक करावं तर

नको तिथे झोडपतोस


आणि परत

जाता जाता माझ्या नादी

लागू नका म्हणून सुनावतोस


अरे रास घरी

यायच्या आधीच

पाणी पाणी करतोस


जर गाली हसू

येताच भसकन

ऐट दाखवून रागावतोस


आता कौतुक

तुझं मी नाही करणार

उगा कशाला माज दाखवतोस


जा आता माघारी

गणपती जाऊ देत सुखाने

रास धान्याची येउ देत घरी आनंदाने


ऐकलं बापड्यांन

पुढे सरकला नेटाने

हळूच कविता टाइप करतो बोटाने....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational