Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaishnavi Kulkarni

Classics

3  

Vaishnavi Kulkarni

Classics

प्रसन्न

प्रसन्न

1 min
333


अंगणी घातला सडा गेरूचा त्यावर शोभे रांगोळी |

त्यात भरल्या रंगांची चित्ताला वाटे नवी नव्हाळी ||

परसात बहरलेल्या फुलांकडे पाहून निराळीच प्रसन्नता वाटे |

दारी झुलणारे टपोऱ्या झेंडूचे तोरण देखून चैतन्य मनी दाटे ||

देवघरात मंद तेवणारी समई अन् जोडीला धूप - उदबत्तीचा सुवास |

अंतःकरण प्रसन्न करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत खास ||

भल्या सकाळचा पाखरांचा मंजुळ कलरव मनाला प्रसन्न करतो |

सर्वत्र भरून राहिलेले हळवावरचे पाणी अर्थात दव,

आपले चित्त प्रसन्नतेने भरून टाकते ||

गोड गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येणारे धुके

देखील अंतरंगात प्रसन्नतेची अनुभूती देते |

शरद ऋतूमध्ये बहरणाऱ्या , उमललेल्या लाल, पिवळ्या,

जांभळ्या फुलांना परडीत घेऊन हृदयी प्रसन्नतेचा वसंत फुलतो ||

निसर्गाने चहूबाजूंना केलेली आपल्या सौंदर्याची पखरण पाहून प्रसन्न होतात नेत्र |

अन् निसर्गाच्या खांद्यावर मस्तक ठेवून चार निवांत क्षण अनुभवता प्रसन्न होतात गात्र ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics