परिवर्तन
परिवर्तन
अर्यागैर्याला जुमानत नाही आम्ही
आम्ही पाच मैत्रीणी म्हणजे
पंचबोलच जसे..
कांचन,माला,लता,रेखा,दिपा
कधी खचत नाही आम्ही
येणाऱ्या संकटातही
आत्महत्येचा विचार तर लयचं दूर
पण!मरणही आम्हाला पाहुन दूर पडते
आमच्या कष्टानिच आम्हाला घडवलं
समाजसेवाही करतो आम्ही आमच्या परीन
आणि संसाराची कसरतही
झेलतोच आहोत मोठ्या जिद्दीने
शिलाच पालन करतच
आम्ही चढ़त आहोत एक एक शिढ़ी
कुणा समोर भीक नाही मागितली की लाचार बनलोत कधी
कधी कधी बनलोत ज्वाला
आणि खानद्यावर वाहिली धुरा संसाराची
का कोणी आत्महत्या करावी
मिळकतिचा काही हिस्सा
ठेवावावा बाजूला
साध सुध गणित कळू नये
हे जग समस्या नीच भरलेल आहे
मग काय जीवन संपवाव
जीवनातील सर्व घटका सारख्या नसते
जीवन हे परिवर्तन शिल आहे
फक्त बुद्धा च एकच वाक्य लक्षात ठेवाव"अत्त !दिप!!भव!!!
स्वयंम प्रकाशित व्हा
