परिक्षा
परिक्षा


कसे कळले नाही तुला
घेतलीस माझी परिक्षा
मी मात्र पुरता बुडालो
काय करू त्याची समीक्षा
तूझा नकार पचला नाही
प्रेमाची रचली मी चिता
आठवणींची देऊन तिलांजली
संपंवली मी सारी गाथा
नवा अध्याय सुरू झाला
नाही फसणार दिखाव्याला
प्रेमाची भाषा नाही समजली
जाणार नाही पुन्हा त्या वाटेला