प्रीत
प्रीत
सरगम गुंतता प्रीतीची
वीणेची साद आली
आलाप घेता सुमधूर
आठव जुनी तुझीच न्हाली
मृग विसरला अस्तित्व
आसमंती दरवळता कस्तुरीगंध
तुझ्या कवेत सख्या रे
नव्याने पसरला स्मृतीगंध
हर्षोत्सव नादावला चौफेर
सनईचा सुरही घुमला
जीव रमला आयुष्यांगणी
तुझ्यासह मला जेव्हा संसार जमला...

