परीक्षा
परीक्षा
कोण घेतय कोणाची परीक्षा ?
कुणाचा गुन्हा, कुणाला शिक्षा
व्यक्ती एक मुखवटे अनेक
कसे समजावे इरादे त्याचे नेक ?
हेही थोर, ते ही थोर
कोण साव कोण चोर ?
नेत्याच्या पाठीवर अपेक्षांची झूल
कायम विझलेली गरीबाची चूल
मरण स्वस्त , जगणं महाग नेता बनला देवाचा अवतार
तो दाखवतो मायावी दुनिया अंध भक्तांची फौज नाक्या नाक्यावर
पोळ्याचा बैल, असत्याची झूल
सरड्यासारखा रंग बदलून
तो नाचतो आमच्या छाताडावर
सत्तासुंदरी भुलली विश्वामित्रावर
