प्रेयसी
प्रेयसी
प्रामाणिक मी राधा तुझी
तुला गोपीका हव्या होत्या
आस तुझी मनी ठेवून
ह्दयामधल्या घाव सोशिल्या होत्या
तु दिलेल्या जखमावारती
फक्त तुझ्या आठवणीचा
मी लेप लावत होती
मला हवे असे वाटणाऱ्या
प्रत्येक क्षणाला तु बेधुंद
लाटावणी काढून फेकला होता
एकटे वाटे मनाला जरी
तुझा सहवास मिळाला नाही
थकलेल्या जीवाला कधी
निसर्गाच्या सानिध्यात तुझ्या साथीचा विसावा मिळाले नाही
बिलगले तुला अश्रुंच्या
धारा गळत राहीले
परी तुझा आधार मिळाला नाही
तुझी राधा बनु पाहिले मी
तु तर मला मीरेचेही स्थान दिले नाही....