प्रेमा
प्रेमा
प्रेमा तुला यायचेच जीवनात
तर क्रांतिचे बीज रोवत ये
उद्ध्वस्त झालेल्या मनाला
जोडण्याचे बळ घेऊन ये
तुला यायचेच जीवनात
तर कारुण्याचे बळ घेऊन ये
ही विषमता नष्ट कराया
लेखणीला तलवारीची धार घेऊन ये
तुला यायचेच माझे जीवनात
माझे सर्वस्व बनण्यास ये
निराधाराला सोबती बनू
असा दयासागर बनून ये
प्रेमा तुला यायचेच जीवनात
स्मित हास्य करीत ये
दुःखीतांना हसविण्यास
सतबुद्धिचे सतेज घेऊन ये

