प्राण ही तो तळमळला
प्राण ही तो तळमळला
भारतभूच्या पदरामध्ये
वीर जन्मला असा
स्वातंत्र्याचा ध्यास घेऊनी
लढत राहिला कसा॥१॥
स्वराज्याचे बाळकडू
स्फूरले धमन्या-धमन्यांत
अभिनव भारत संघटना
कोरली प्रत्येकाच्या मनात॥२॥
देशभक्तीची ज्योत पेटवून
जागृत केली जनता
परकियांवर उठवत आवाज
विरोध केला ना जुमानता॥३॥
बुद्धिचातुर्य अफाट होतेे
भाषाशुद्धी घडविली
मराठीचा बाळगून अभिमान
बिजं भाषेची रुजविली॥४॥
मातृभूमीच्या प्रेमापायी
प्राण हि तो तळमळला
यातना सोसणारा देेह ही
तेव्हा वेदनेनेे कळवळला॥५॥
प्रेरणादायी विचारांची
ठेव दिली जगाला
ताठ मानेने जगणे
शिकविले या युगाला॥६॥
