पोलिस
पोलिस
मर्द महाराष्ट्राची मर्द पोलीस ही।
मावळे रयतेचे हमदर्द पोलीस ही।।
पोलीसवाला चोरांसाठी घोर असतो।
इमानदार पोलीस कमजोर नसतो।।धृ।।
परीवारा सोबत दुनिया आनंदी घरात।
दिवाळीला फोडती पटाखे जोरात।।
बापासाठी रडनारा घरी पोर असतो।
पोलीसवाला ड्युटीवर हजर असतो।।१।।
जिम्मेदारी मोठी समाजास राखण्याची।
रक्षणाला कायद्याच्या ऊभा ठाकण्याची।।
समाजकंटकावर तो शिरजोर असतो।
कर्तव्यदक्ष भारताचा पोर असतो।।२।।
ऊन्हाळा असो वा हिवाळा, पावसाळा ।
चोवीस तास ड्यूटीवर तैनातीला धाळा।।
जनतेच्या जीवाला जेव्हा घोर असतो।
संकटाला रोखण्या समोर असतो।।३।।
देशासाठी पोलिसांचे बलिदान पाहिले मी।
म्हणून देशासाठी जीवन वाहीले मी।।
सपूत खरा मातृभूमीचा थोर असतो।।
विनाकारण पोलिस कठोर नसतो।।४।।
आई-बहीनींची अब्रृ राखणारे पोलिस।
सुखासाठी जनतेच्या राबणारे पोलीस।।
शिवकवी म्हणे पोलिस न्यायाची डोर असतो।
समाजाच्या भल्यासाठी त्यांचा जोर असतो।।५।।
