पंधरा ऑगष्ट
पंधरा ऑगष्ट


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....!
जयहिंद जयहिंद जयहिंद
जयहिंद जयहिंद जयहिंद।।धृ।।
स्वतंत्र आमुची मायभूमीही
करूया वंदन तिजला
म्हणूनि वंदे मातरम....।।१।।
पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर
सीमा आमच्या अभेद्य
एकी आमची आहे हृद्य।।२।।
असतील अनेक जाती
असतील अनेक धर्म पंथ
एकच आमचा स्नेहबंध।।३।।
अनेक भाषा अनेक बोली
प्रत्येकास प्रिय जरी मायबोली
आहे इथेच एकदीलाची कबुली।।४।।
एका धाग्याचे वस्त्र भारत
एकच इथला धर्म सहिष्णुतेचा
आहे जीवन जगण्या माणुसकीचा।।५।।
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना
उरभरून आपोआप प्रत्येकाचा येतो
जो तो ग्वाही एकतेची सदैव देतो।।६।।
म्हणून म्हणतो आपण आनंदाने
जयहिंद जयहिंद जयहिंद
जयहिंद जयहिंद जयहिंद।।धृ।।