पक्षिणीची माया..!
पक्षिणीची माया..!
तिनं बांधलं घरटं
धागा धागा जमवून
देई पिल्लांना ती ऊब
मन जाई सुखावून
जन्म होता लेकरांचा
घेते काळजी जागून
जपा जिवाला पिल्लांनो
जाते बाहेर सांगून
दाणा दाणा वेचून ती
आणी चोचीत धरून
समाधानी होते माय
पिल्लांना तो भरवून
वारा वादळ सोसते
पिल्ल पंखात घेऊन
माया ममतेची मूर्ती
आहे पक्षीण असून
