फुटका प्याला
फुटका प्याला
जिनगानी कवा वाटते
अर्धा फुटका प्याला
कित्ती प्याव कित्ती खाव
भरत नाई हा पोटाचा झोला
धोब्यावानी जीव आपटला
पैसाची रास झळली
चेला गेला संघटनेत
मानसाची रास पळली
इकुन तिकुन बसल्या
डागण्या
जिवाचे झाले येले
हातात धरून धोतर
भाषण मोठे झोडे
चाहा ईकू इकू सरकार
खाऊन रॉयल भाव
खजिना देशाचा खाली
नई चालू रायला चाल
शेतकरी भावांनो
भरून ठेवा पेव धान्याचे
सरकार झुकल तवा लावा
भाव कस्टाचे
जरी जगता तुम्ही
खर्या इमानिन
खोट्याचा भरते प्याला
सारा बैयमानिन
