फक्त तूच
फक्त तूच
वावरतेस तू
दिसतेस तू
शब्द माझे असले तरी
कवितेत उतरतेस फक्त तूच...
विचारात तू
ध्यानातही तू
समजावू तरी कसं मनाला.?
मनातही या असतेस फक्त तूच...
शब्द तू
कविता तू
वाचणारे कैक असतीलही
पण मिळालेली वाहवा फक्त तूच...
कारण.. ?
कारण लिहिलेली प्रत्येक कविता तुझ्यावरच तर आहे ना
म्हणून फक्त तूच....
