|| पडे पाऊस कधीचा ||
|| पडे पाऊस कधीचा ||
1 min
7.3K
पडे पाऊस कधीचा, माझ्या मनाच्या मनात|
चिंब भिजलो रानात, रीम झिम पावसात||
मोरपंखांची लहर, माझ्या प्रीतीच्या शेतात|
वारा गोंजारीत बसे, गुज प्रेमाच्या मळ्यात||
मन पाखरू होवून, हिंडे रानात वनात|
कधी भ्रमर होवून हिंडे, प्रेमाच्या फुलात||
दोन जीवांचे काहूर, असे गोजिर्या फुलात|
आठवणींचा उमाळा झरे, प्रेमाच्या बागेत||