पावसाचे थेंब
पावसाचे थेंब
पावसाचे थेंब जमिनीवर जेव्हा पडतात
तेव्हा ते मला माझ्या बालपणात घेऊन गेलेले असतात
ओल्या सरींनी पसरविलेला अत्तराचा सडा मानाला मोहुन टाकतात
पावसाचे थेंब जगण शिकवतात तप्त भुमिचा दाह निववितात
दूर ढंगाशी असलेल भुमीच नात घट्ट करतात
पावसाचे थेंब जेव्हा जमिनीवर पडतात
सरत्या वयान निसटून गेलेले हळवं बालपण
नव्यानं जगायला शिकवतात
दूर क्षितीचावरची सप्तरंगी इंद्रधनुष्यची कमान पाहुन
आयुष्यात नवे रंग भरायला लावतात
पावसाचे थेंब जगण्याचा दाह कमी करतात
हळुवार मायेने कवेत घेतात जगणं सोप करतात पावसाचे थेंब
जमीनीला नवा तजेला देतात सृष्टीला संजीवणी घेऊन येतात पावसाचे थेंब
