STORYMIRROR

Rajesh Sabale

Tragedy Abstract

2  

Rajesh Sabale

Tragedy Abstract

पावसा पड जरासा खाली

पावसा पड जरासा खाली

1 min
2.8K


काळोख दाटला अन मेघांनी गर्दी केली।

डोळ्यात आले पाणी, पण बरसात नाही झाली।।

तरी माणूस पावसाला, म्हणे पड जरासर्व खाली।।धृ0।।

 

निर्लज्य माणसाने सारी, भुई सपाट केली।

डोंगर माळरानं सारी, कचरा कुंडी झाली।।

बांधून इमले माड्या, शेती विकून झाली।

इमेलच्या कचऱ्याने, गटारे सारी भरली।।

तरी माणूस पावसाला, म्हणे पड जरासा खाली।।१।।

 

निसर्गाच्या छाती वरती, लई केली हेराफेरी।

तुझीच करणी तुजला, पडेल एक दिन भारी।।

रसायने कंपन्यांनी सारी, घाण नदीची केली।

पेट्रोल-डिझेलच्या धुराने, फुफ्फुसे भरून गेली।।

तरी माणूस पावसाला, म्हणे पड जरासा खाली।।२।।

 

अनु-रेणू, परमाणूने, सारी सृष्टी नासविली।

नियतीच्या नियमांची, पार पायमल्ली केली।।

जमिनीत पाणी जिरण्या, ना जागा कुठे उरली।

मस्तवाल माणसाला, अजून जाग नाही आली।।

तरी माणूस पावसाला, म्हणे पड जरासा खाली।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy