पाऊसवल्ली
पाऊसवल्ली
पाऊस म्हणजे लहरी वल्ली,कधी अल्लड,कधी गंभीर,कधी नवथर,कधी खंबीर.
आजकाल वागतोय जसा स्वछंद कलाकार,
दिवसेंदिवस दडी नाहीतर मुसळधार प्रलयंकार.
कुठे अवकाळी हजेरी कोसळून धराशाही संसार
अमर्याद आवेग माजवीत सर्वत्र हाहाःकार.
निरागस बाल्याचे उत्सुक तुषार,
हवेत काव्यमय सृष्टीचे सुंदर आविष्कार.
ये भेटी मातीचा धुंद सुगंध लेऊन,
पुन्हा एकदा ये डौलाने जीवनतत्व होऊन.
