STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

पाऊसा

पाऊसा

1 min
281

वाट तुझी पाहत, बसलो रे माझा पाऊसा

शेत हे तुझ्या धारीन, कर आता ओल सार

येऊ दे आता नवीन बहर, वर्षू दे आता धारा

शेतामंधी पक्ष्यांची, होऊ दे आता गजर  ।।१।।


ऊन साऊली करून, आले भरून नभ

किती होतोय गरम, तुटून पडला ढग

वाहून काढली सारी नदी, नाले, खोरे

शेतकरीची हृदयात वाजवली तारे  ।।२।।


अशी ही मयानं, फुलली सारी देवा

तुझ्या धारानं ही पसरली, हिरवी चादर देवा

येऊ दे आता येंदा, भरगच्च धान्य कपास देवा

तुझ्या पाया पुणी, नांदू दे संसार माझा देवा ।।३।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational