STORYMIRROR

kishor zote

Inspirational

3  

kishor zote

Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
14.3K


 

ग्रीष्मावर मात येतो हा पाऊस

सरसर सरींचा असा हा पाऊस

टपोऱ्या त्या थेंबाचा हा पाऊस

मातीचा ही गंध होतो हा पाऊस. 

आठवणींचा दाटलेला हा पाऊस

मनाला ही हलके करतो हा पाऊस

भुरभुर दिवसभर असतो हा पाऊस

ढगफुटीचा कोसळणारा हा पाऊस

भोरं पाणी असा सर्वत्रच हा पाऊस

काळं पाणी वाहवणारा हा पाऊस

चिकचिक चिखल करतो हा पाऊस

शेतात शोभे जसा मोत्यांचा हा पाऊस. 

शी... वैताग आणलाय काय हा पाऊस?

व्वाव... काय मस्त मजा ना हा पाऊस!

उघडीप पानझड करतो हा पाऊस

उन्हातही मग कधी पडतो हा पाऊस. 

अंगणात बरसणारा पाहुणा हा पाऊस

चिंब चिंब ओल करणारा हा पाऊस

डोळ्या आड लपलेला कसा हा पाऊस?

तरीही हवाहवासा वाटतोच ना हा पाऊस!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational