STORYMIRROR

Jayshri Dani

Classics

3  

Jayshri Dani

Classics

पाऊस पडून गेल्यानंतर

पाऊस पडून गेल्यानंतर

1 min
151

पाऊस पडून गेल्यानंतर 

मी नभांचा 

ओल्या मातीचा.....

झाडांवर चकाकणाऱ्या उन्हाचा

खिडकीच्या गजातून टपकणाऱ्या थेंबांचा...


पाऊस पडून गेल्यानंतर 

मी हर्षभरित फांदीवर झुलणाऱ्या गाण्याचा....

रूणझुणाऱ्या वाटांचा... 

जीवाला लळा लावणाऱ्या रानाचा...


पाऊस पडून गेल्यानंतर 

मी कातरवेळी वेडावणाऱ्या चंद्रबिंबाचा...

भूतकाळातील सुगंधी आठवांचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics