विजयादशमी
विजयादशमी
आश्विन महिन्याची
होता सुरुवात
होई नवरात्र
उत्सवाची बरसात
सांगता नवरात्राची
जल्लोष विजयाचा
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा
वाईट विचारांचा
करून अंत
ठेवायची नाही
मनी खंत
द्वेषाच्या पुतळ्याला
करुनि दहन
चांगल्या वृत्तीचे
करु आचरण
आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण
प्रेमाचा ओलावा
करुनि दान
लाल पिवळ्या
झेंडूचे तोरण
बांधू सारे
दारी आपण
